शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी'वर भीषण अपघात: जालन्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत ७ कामगारांचा मृत्यू, ३ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:48 IST

काळीज पिळवटून टाकणारी घटना! समृद्धीवर सफाई ७ कामगारांचा जागीच अंत; भरधाव ट्रकने अक्षरशः चिरडलं!

जालना: समृद्धी महामार्गावर आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने महामार्गाची सफाई करणाऱ्या महिला कामगारांच्या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्याजवळील जामनेर-कडवंची शिवारात हा अपघात झाला असून, मृत आणि जखमी सर्व कामगार महिला असल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

भरधाव ट्रकने घेतला कामगारांचा बळीमिळालेल्या माहितीनुसार, या महिला कामगार समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत. काम आटोपून कामगार महिला त्यांच्या गाडीत बसल्या. त्यांची गाडी महामार्गाच्या कडेला उभी असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने तिला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कामगारांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये सात महिला कामगारांना जागीच आपले प्राण गमवावे लागले, तर अन्य जखमींना उपचारासाठी तातडीने जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत आणि जखमींमध्ये महिला कामगारांचा समावेशसमृद्धी महामार्ग अपघात जखमींची नावे:प्रयागबाई बाबासाहेब वाघ (वय ३०),कविता विठ्ठल चौधरी (वय ३५),दिनेश रंगनाथ गायकवाड (वय ४२),एक अनोळखी (वय ५०) ही जखमीची नावे असून त्यांच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समृद्धी महामार्ग अपघातील मृतांची नावे: अलकाबाई दादाराव आदमाने (वय ४५, रा. निधोना), लक्ष्मीबाई संतोष मदन (वय ३५, केळीगव्हाण), मीना परमेश्वर आदमाने (वय ४५, रा. निधोना), कांचनबाई प्रकाश आदमाने (वय ५०, रा. निधोना), ताराबाई गहेणाजी चौधरी (वय ६०, रा. केळीगव्हाण), कडूबाई रामदास मदन (वय ५५, रा. केळीगव्हाण), सुमनबाई कचरू आदमाने (वय ७०, रा. निधोना)

महिनाभरात दुसरी मोठी दुर्घटना; प्रशासन सुस्त?विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडजवळ अशाच एका भीषण अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तेव्हा रस्ता दुरुस्तीचे काम करून जेवण करत बसलेल्या कामगारांना एका ट्रकने चिरडले होते. एकाच महिन्याच्या अंतराने कामगारांचा बळी घेणारा हा दुसरा मोठा अपघात असल्याने, समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समृद्धीवर वारंवार अपघाताने चिंता अपघातामुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील 'ओव्हरस्पीड' आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीवर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy on Samruddhi Expressway: Truck Kills 7 Workers Near Jalna

Web Summary : A speeding truck struck workers on the Samruddhi Expressway near Jalna, killing seven and seriously injuring three. This is the second fatal accident involving workers in a month, raising safety concerns. Police are investigating.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातJalanaजालना