शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाल परी नव्या साजशृंगारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:20 IST

नव्या नवरी प्रमाणे नटलेली ही एक नवीन बस रविवारी जाफराबाद आगारात दाखल झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : ग्रामीण जनतेच्या प्रवासाची मुख्य मदार सांभाळणारी लालपरी आता वेगळ््या लुकमध्ये दिसली तर कोणाला नवल वाटायला नको. नवी नसली तरी नव्या नवरी प्रमाणे नटलेली ही एक नवीन बस रविवारी जाफराबाद आगारात दाखल झाली आहे.जालना येथून जाफराबादला जाताना ही नवपरी जेव्हा टेंभुर्णी स्थानकावर आली तेव्हा सर्वच प्रवासी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. काहींनी तर ही आपली बस नसून खाजगी बसच आहे म्हणून तिच्यात बसायचेही टाळले होते. मात्र, तिच्यात बसचे वाहक- चालक दिसताच प्रवाशांनी तिच्याभोवती गराडा घातला.वरील भाग पांढरा शुभ्र व खालून एक छोटा लालपट्टा या रूपात स्टील बॉडी घेऊन ही लाल परी नटली आहे. आगाराच्या ज्या बसेसची दुरवस्था झाली आहे. अशा बसेसचे नूतनीकरण सध्या एसटीच्या औरंगाबाद वर्कर्शापमध्ये केले जात आहे.त्यानुसार जाफराबाद आगारातून दोन जुन्या बसेस नूतनीकरणासाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका बसचे प्रवाशांच्या सेवेत आगमन झाले आहे.या बसची उंचीही थोडी वाढविण्यात आली असून तिला एशियाड सारखा लुक देण्यात आला आहे. दरम्यान इंजिन जुने असले तरी नवे रूपडे घेऊन आलेली ही लालपरी सर्वांना हेवा वाटावा अशीच दिसत असल्याने प्रवासी मोठ्या आवडीने तिच्यात बसत आहेत.सर्वच बस नवीन लुकमध्ये -निकमयापुढे सर्वच बस याच नवीन लुकमध्ये बनविल्या जाणार असल्याची माहिती एसटी कामगार सेनेचे जाफराबाद आगार अध्यक्ष धनंजय निकम यांनी दिली आहे. दरम्यान लाल परीचे हे सुंदर रूपडे प्रवाशांना नक्कीच मोहिनी घालणार असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळtourismपर्यटन