वकील संघाच्या अध्यक्षपदी एस. एम. देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:13+5:302021-02-26T04:44:13+5:30
गुरुवारी ही निवडणूक पार पडली. यात अध्यक्ष देशपांडे यांना २८८ मते मिळाली असून, त्यापाठोपाठ उपाध्यक्ष राऊत २३७, सचिव ॲड. ...

वकील संघाच्या अध्यक्षपदी एस. एम. देशपांडे
गुरुवारी ही निवडणूक पार पडली. यात अध्यक्ष देशपांडे यांना २८८ मते मिळाली असून, त्यापाठोपाठ उपाध्यक्ष राऊत २३७, सचिव ॲड. शेख २३४, सचिव ॲड. १६५ मते मिळवून विजयी झाले आहेत. ही निवडणूक यशस्वपणे पार पाडण्यासाठी ॲड. वाल्मीक घुगे, ॲड. राहुल चव्हाण, ॲड. दशरथ शिराळे, ॲड. राजेंद्र सदगुरे, ॲड. सुजित मोटे, ॲड. लावंजी घोडे आणि ॲड. गोपाल मोरे यांनी प्रयत्न केल्याची माहिती ॲड. अरविंद मुरमे यांनी दिली. निकालांची घोषणा झाल्यावर विजयी उमेदवारांचा उपस्थित वकिलांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी ॲड. देशपांडे, तसेच अन्य विजयी उमेदवारांनी मतदरांचे आभार मानून सर्वांना सोबत घेऊन आपण वकिलांचे प्रश्न आणि अडचणी सोडवू, अशी प्रतिक्रिया ॲड. एस. एम. देशपांडे यांनी व्यक्त केली.
चौक्ट
संजय देशपांडेंना वकिलीचा शंभर वर्षांचा वारसा
वकील संघाचे नूतन अध्यक्ष ॲड. संजय देशपांडे यांना वकिली व्यवसायाचा शंभर वर्षांचा वारसा लाभला आहे. मूळचे परतूर येथील रहिवासी असलेले देशपांडे परिवारातील पहिले वकील म्हणून धोंडोपंत रामराव देशपांडे यांनी निजमाकडील नोकरी सोडून वकील व्यवसाय परतूर येथे सुरू केला. १९२५ मध्ये ते जालन्यात आले. त्यानंतर त्यांचे पुत्र रामचंद्र प्रभाकर देशपांडे हे १९५२ मध्ये उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी वकिली पूर्ण केली. तसेच धोंडोपंत यांचे दुसरे पुत्र मधुकर देशपांडे यांनी वकिलीचे शिक्षण पुणे येथे घेऊन जालन्यात प्रॅक्टीस केली. मधुकर देशपांडे यांचा पुतण्या मिलिंद रामचंद्र देशपांडे तसेच मधुकर देशपांडेंचे पुत्र एम. एम. देशपांडे यांनी १९८७ ला व्यवसाय सुरू केला. तसेच ॲड. संदीप देशपांडे हे वकील असून, आता विजय देशपांडे यांचे पुत्र विक्रांत देशपांडे हेही घराण्याचा वारासा पुढे चालवीत आहेत.