शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीतून ग्रामविकासही साधला जावू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय ...

टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र शनिवारी डोलखेडा (खु. ता. जाफराबाद) येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.

माजी सरपंच भानुदास डोईफोडे यांच्या शेतात आयोजित चर्चासत्रास कृषी सहायक विनायक मेहेत्रे, व्ही. पी. घुसळकर, संदीप डोईफोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गटशेतीच्या माध्यमातून डोलखेड्यात जनता दरबार भरविण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली. त्याची सुरुवात १४ जानेवारीपासून करण्याचे ठरविले. यावेळी अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पअंतर्गत लागवड केलेल्या सीताफळ बाग, ऊस लागवड, अद्रक शेती आदी ठिकाणी शिवारफेरी काढण्यात आली. यावेळी सरपंच गजानन बनकर, माजी सरपंच भानुदास डोईफोडे, अशोक डोईफोडे, गजानन डोईफोडे, हरिभाऊ डोईफोडे, ग्रामसेवक सचिन डोईफोडे, नंदकिशोर देशमुख, ज्ञानदेव गाडेकर, विठ्ठल खपुटे, महादू गाडेकर, गोपाल जाधव, बाबासाहेब जाधव, रामेश्वर उकंडे, गजानन काळे, शिवहरी डोईफोडे, कुंडलिक डोईफोडे, मदन डोईफोडे, गजानन डोईफोडे, समाधान डोईफोडे, दत्तू बनकर, दत्तू डोईफोडे, सतीश डोईफोडे, शिवाजी डोईफोडे, जनार्दन सोसे, गजानन डोईफोडे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

कॅप्शन : डोलखेडा शिवारातील शिवारफेरीदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय मोरे. यावेळी उपस्थित शेतकरी.