गटशेतीतून ग्रामविकासही साधला जावू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:55+5:302021-01-10T04:23:55+5:30
टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय ...

गटशेतीतून ग्रामविकासही साधला जावू शकतो
टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केले. अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र शनिवारी डोलखेडा (खु. ता. जाफराबाद) येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
माजी सरपंच भानुदास डोईफोडे यांच्या शेतात आयोजित चर्चासत्रास कृषी सहायक विनायक मेहेत्रे, व्ही. पी. घुसळकर, संदीप डोईफोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गटशेतीच्या माध्यमातून डोलखेड्यात जनता दरबार भरविण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली. त्याची सुरुवात १४ जानेवारीपासून करण्याचे ठरविले. यावेळी अॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पअंतर्गत लागवड केलेल्या सीताफळ बाग, ऊस लागवड, अद्रक शेती आदी ठिकाणी शिवारफेरी काढण्यात आली. यावेळी सरपंच गजानन बनकर, माजी सरपंच भानुदास डोईफोडे, अशोक डोईफोडे, गजानन डोईफोडे, हरिभाऊ डोईफोडे, ग्रामसेवक सचिन डोईफोडे, नंदकिशोर देशमुख, ज्ञानदेव गाडेकर, विठ्ठल खपुटे, महादू गाडेकर, गोपाल जाधव, बाबासाहेब जाधव, रामेश्वर उकंडे, गजानन काळे, शिवहरी डोईफोडे, कुंडलिक डोईफोडे, मदन डोईफोडे, गजानन डोईफोडे, समाधान डोईफोडे, दत्तू बनकर, दत्तू डोईफोडे, सतीश डोईफोडे, शिवाजी डोईफोडे, जनार्दन सोसे, गजानन डोईफोडे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कॅप्शन : डोलखेडा शिवारातील शिवारफेरीदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय मोरे. यावेळी उपस्थित शेतकरी.