‘त्या’ वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्येही रूबी मेडिकलचा उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:22+5:302021-07-14T04:35:22+5:30
याआधीदेखील महसूल विभागातील अधिकारी तसेच शहरातील काही भूखंडमाफियांच्या संभाषण क्लिपमध्येदेखील याच मेडिकल दुकानाचा आवर्जून उल्लेख होता. त्या मेडिकलमधून उत्तेजक ...

‘त्या’ वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्येही रूबी मेडिकलचा उल्लेख
याआधीदेखील महसूल विभागातील अधिकारी तसेच शहरातील काही भूखंडमाफियांच्या संभाषण क्लिपमध्येदेखील याच मेडिकल दुकानाचा आवर्जून उल्लेख होता. त्या मेडिकलमधून उत्तेजक औषधींना टोपण नाव चॉकलेट दिले होते. त्यात एकजण हा समोरील व्यक्तीस त्या दुकानातून चॉकलेट घेऊन जा आणि संबंधित व्यक्तीसह तू देखील घे, असे संभाषण होते. त्यामुळे त्या वादग्रस्त क्लिपचाही या कालच्या प्रकरणाशी धागेदोरे जुळतात काय, याकडेही आता अन्न-ओषधीसह पोलिसांकडून तपास झाल्यास बरेच मोठे मासे गळाला लागू शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.
चौकट
‘त्या’ ऑडिओ क्लिपची चौकशी रेंगाळली
महसूल विभागातील तलाठी तसेच शहरातील काही व्यापारी यांच्यातील ‘ती’ ऑडिओ क्लिप आहे. ही क्लिप एका तलाठ्याची असून, त्याने याप्रकरणी संभाषणाचा पेनड्राईव्ह चोरल्याची तक्रार दिली होती. त्या क्लिपची चौकशी ही विभागीय आयुक्तांच्या पातळीवर सुरू आहे. परंतु ती चौकशी पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे दिसून आले.