राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:53+5:302021-09-08T04:35:53+5:30
वडीगोद्री : आज समाजात शिक्षकांचा मोठा आदर आहे. राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. गुरूचे महत्त्व प्राचीन काळापासून ...

राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - पवार
वडीगोद्री : आज समाजात शिक्षकांचा मोठा आदर आहे. राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. गुरूचे महत्त्व प्राचीन काळापासून सर्वांना ज्ञात आहे. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा शाळा बंद, पण शिक्षण सुरू आहे. शिक्षणाची प्रक्रिया ही जन्मापासून सुरू होते, तर मृत्यूनंतर थांबते. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे, असे मत अंबड पंचायत समितीचे विषयतज्ज्ञ अशोक पवार यांनी मांडले.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होेत. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष मांगदरे, माजी मुख्याध्यापक प्रल्हादसिंग ठाकूर, भागवत घुगे, पर्यवेक्षिका जे. डब्ल्यू. दांडगे, ए. एम. साळुंके,जी. आर. गावडे, पी. आर. गावडे, संध्या खटके, दीपक पवार, रोहिदास पवार, श्रीराम गंनगे, ए. जी. खांडेभराड, पांडुरंग बांगर, अर्जुन गिरी, विठ्ठल राठोड, एम. डी. घोडसे, एस. ए. कदम आदींची उपस्थिती होती.
यावेळी माजी केंद्रप्रमुख आर. एस. बांगर म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा चालक आहे. शिक्षकाला विद्यार्थ्यांची गरज ओळखता आली पाहिजे. शिक्षक हा नेहमीच दक्ष असला पाहिजे. शिक्षक झोपला तर समाज उद्ध्वस्त होईल. एका विचारधारेचे लोक एकत्र आले तर विकास व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे. शिक्षक अनिल खंडागळे म्हणाले, शिक्षण हे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एन. माळशिकारे यांनी केले. आभार सुदर्शन गावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक सोलनकर, शुभम ठाकूर, सुनील गायकवाड, विष्णू नाझरकर, गोरखनाथ कोल्हे, सनी भोईटे, सलाउद्दीन पिरजादे, अशोक बिडे यांनी परिश्रम घेतले.