कोरोनाच्या काळात आशांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:04+5:302021-01-03T04:31:04+5:30
जालना : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. या काळात आशांनी रात्रंदिवस काम करून आपली जबाबदारी ...

कोरोनाच्या काळात आशांची भूमिका महत्त्वाची
जालना : मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. या काळात आशांनी रात्रंदिवस काम करून आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाच्या काळात आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले.
आरोग्य विभागातर्फे आशा दिनानिमित्त शुक्रवारी जालना शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. सीईओ अरोरा म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात आशा स्वयंसेविकांनी जे काम केले ते कौतुकास्पद आहे. गावागावांत कोरोनाची भीती पसरलेली असतानाही जीवाची पर्वा न करता त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली. त्यानंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीमही यशस्वीपणे राबविली. त्यामुळेच आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. येणाऱ्या वर्षातही आशांनी चांगले काम करावे, असे आवाहनही अरोरा यांनी केले. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आशा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत ज्योती तांबट (प्रथम), कल्पना गाढे (द्वितीय), गौरी कुचन (तृतीय), पोस्टर स्पर्धेत कविता कांबळे (प्रथम), रेखा भिंगारे (द्वितीय), रेखा पुरी (तृतीय) तर होम मेड केक स्पर्धेत निर्मला कोल्हे (प्रथम), शैला पांगरकर (द्वितीय), वेशभूषा स्पर्धेत वैशाली गंगातीवरे (प्रथम), किरण बोरकर (द्तिीय) तर कुसुम मोगरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी सोनी यांच्यासह आशा स्वयंसेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.