दानापूर येथे रोहित्रचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:55+5:302021-01-15T04:25:55+5:30
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील बसस्थानक भागातील रोहित्रला गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर काही ...

दानापूर येथे रोहित्रचा स्फोट
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील बसस्थानक भागातील रोहित्रला गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर काही वेळातच रोहित्रचा स्फोट झाला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मुख्य विद्युत वाहिनीवरील तारा तुटून खाली पडल्या. रोहित्रमधील ऑईल बाहेर पडल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगेच्या लाटा उंचावर जात असल्याने गावकºयांनी मोठी गर्दी केली होती. बहुतांश लोक लघुशंकेसाठी या ठिकाणी जातात. तसेच रोहित्रजवळच दुकाने आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी असते. सकाळी दुकाने बंद असल्याने गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. दरम्यान, सदरी रोहित्र दुस-या जागेवर स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे उमेदवारांची धावपळ सुरू आहे. त्यातच रोहित्र जळाल्याने उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे.