खराब रस्त्यावर ट्रक अडवून चालकाची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:34+5:302021-03-26T04:29:34+5:30

जालना : खराब रस्त्याचा फायदा उचलत चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच पैकी चार आरोपींना गुन्हे शाखेचे चोवीस तासांच्या ...

Robbery of a truck on a bad road | खराब रस्त्यावर ट्रक अडवून चालकाची लूट

खराब रस्त्यावर ट्रक अडवून चालकाची लूट

जालना : खराब रस्त्याचा फायदा उचलत चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच पैकी चार आरोपींना गुन्हे शाखेचे चोवीस तासांच्या आत जेरबंद केले. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास जालना-देऊळगाव राजा मार्गावरील कन्हैयानगर जवळ घडली होती.

झारखंड राज्यातील ट्रक चालक सुजित यादव हे गुरुवारी पहाटेच्या सुमारास जालना- देऊळगाव राजा मार्गावरून जात हाेते. त्यांचा ट्रक कन्हैयानगर भागातील खराब रस्त्यावर आला असता पाच जणांनी ट्रकमध्ये चढून चालकास मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून मोबाइल व रोख रक्कम घेवून पोबारा केला. घटनेनंतर चालक नवीन मोंढ्याजवळील पेट्रोल पंपावर थांबला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील आरोपी इतर वाहनचालकाला लुटण्यासाठी घटनास्थळावर असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ते आरोपी एका ट्रकला अडवून चालकाला मारहाण करीत होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सागर बाबुराव गंगावणे (रा. कन्हैयानगर जालना) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अमोल राजू खरात, शुभम लहू जाधव, किरण संजू सरकटे व इतर एकाच्या मदतीने लूटमार केल्याची कबुली दिली. मिळलेल्या माहितीनुसार पोलिसांनी इतर तिघांनाही ताब्यात घेतले. या चौघांना अधिक तपासासाठी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुभाष भुजंग, पोहेकॉ किशोर एडके, प्रशांत देशमुख, संजय मगरे, रामेश्वर बगाटे, रंजित वैराळ, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सचिन चौधरी, देवीदास भोजने, रमेश पैठणे आदींच्या पथकाने केली.

फोटो

Web Title: Robbery of a truck on a bad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.