लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यातील आरदखेडा येथील धर्मदास महाराजांच्या मठात शनिवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी चांदीच्या पदुका, चांदीची छत्री असा एकूण १ लाख २० हजाराचा मुद्देमाल लंपास केला.आरदखेडा येथील धर्मदास महाराज मंदिराचे कुलूप तोडून शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. मंदिरातील ८० हजार रूपये किंमतीची चांदीच्या पादुका, ४० हजार रूपये किंमतीची चांदीची छत्री असा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच ठसे तज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचरण करण्यात आले होते. या प्रकरणी गजबसिंग घुसिंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अभिजित मोरे हे करीत आहेत. दरम्यान, मठातील चोरीची घटना ताजी असतानाच आदर्शनगर भागात एक व्यक्ती संशयितरित्या आढळून आला. नागरिकांनी चौकशी केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिकच चौकशी होऊ लागल्याने दुचाकी सोडून त्या व्यक्तीने पळ काढला. पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेतली आहे.
आरदखेडा येथील धर्मदास महाराज मंदिरात जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:28 IST