शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

स्टील कंपनीच्या लेखापालास एमआयडीसीत भर दिवसा लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:14 AM

एका स्टील कंपनीच्या लेखापालाकडील दीड लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून हिसकावून घेत पोबारा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील एका स्टील कंपनीच्या लेखापालाकडील दीड लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून हिसकावून घेत पोबारा केला. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली.औद्योगिक वसाहतीमधील भाग्यलक्ष्मी स्टील कारखान्यात सनी गणेश चिलखा (३२, रा. संभाजीनगर) हे लेखापाल म्हूणन काम करतात. दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास चिलखा हे अन्य एका साथीदारासोबत दुचाकीने औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी कंपनीतून दीड लाख रुपये घेऊन भाग्यलक्ष्मी कंपनीकडे जात होते. गजकेसरी कंपनीपासून काही अंतरावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे चिलखा यांच्या साथीदाराने दुचाकीचा वेग कमी केला. त्याच वेळी दोघेजण विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव आले. त्यांनी सनी चिलखा यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावली. चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत पळून गेले. या प्रकारानंतर चिलखा यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात येऊन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे ठाणे अमलदार उद्धव साळवे यांनी सांगितले. फौजदार एस. एन. शेख तपास करत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये या पूर्वीही असे प्रकार घडले आहेत. व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :RobberyदरोडाMIDCएमआयडीसी