सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:58 AM2019-12-27T00:58:42+5:302019-12-27T00:59:02+5:30

चोरट्यांनी एकाला चाकूचा धाक दाखवून दहा मोबाईल, गळ्यातील सोन्याचा शिक्का व पंधरा हजार रुपये असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला

Robbery in Chandanzira area by armed trio | सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट

सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : चोरट्यांनी एकाला चाकूचा धाक दाखवून दहा मोबाईल, गळ्यातील सोन्याचा शिक्का व पंधरा हजार रुपये असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शहरातील चंदनझिरा भागातील सत्यमनगर येथील सिराज पटेल यांच्या घरी बुधवारी मध्यरात्री घडली.
चंदनझिरा या भागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. बाहेरील राज्यातील कामगार या भागात राहतात. सिराज पटेल यांच्या मालकीच्या पाच रूममध्ये रात्री अडीच वाजता चोरी झाली. यामध्ये गगणदेव शहा एका रूममध्ये झोपलेला होता. एक चोरटा खिडकीमधून आतमध्ये आला. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनी आत प्रवेश करून गगनदेव शहा याच्या मानेवर चाकू धरला. तसेच त्याला मारहाण करून बॅगमधील तीन हजार, मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी बाजूच्या रूममध्ये जाऊन बॅग, कपडे, कॅश पैसे, एटीएम कार्ड व मोबाईल असा माल लंपास केला. यामध्ये राजेश शहा, प्रदीप कुमार राम, अनिल पासवान, रवी कुमार, शिवप्रसाद केवट, त्रिभुवन राम, महेश पासवान यांच्या वस्तू गेल्या आहेत. चोरटे फरार झाल्यानंतर शहा यांनी घर मालकाला हकीत सांगितली. त्यानंतर लगेच त्यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.
चंदनझिरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
गुरुवारीही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. त्यात तीन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पो.नि. शामसुंदर कौठाळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Robbery in Chandanzira area by armed trio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.