साईनगर येथे दरोडा टाकणारा गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:17+5:302021-02-05T07:59:17+5:30
जालना : शहरातील साईनगर येथील एका घरात दरोडा टाकणा-या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. नीलेश भिंगारे असे ताब्यात घेतलेल्या संशयित ...

साईनगर येथे दरोडा टाकणारा गुन्हेगार अटकेत
जालना : शहरातील साईनगर येथील एका घरात दरोडा टाकणा-या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. नीलेश भिंगारे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून घरगुती वापराचे साहित्य व एक आयशर असा १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नीलेश भिंगारे व त्याच्या १० ते १५ साथीदारांनी साईनगर येथील आशाबाई सरकटे यांच्या घरात घुसून फिर्यादीच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांना आरडाओरड करता आली नाही. त्याचाच फायदा घेत आरोपींनी घरातील घरगुती वापराचे साहित्य एक आयशर ट्रकमध्ये भरून घेऊन गेले. या प्रकरणी आशाबाई सरकटे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात २७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी नीलेश भिंगारे यास अटक करून न्यायालयाकडून त्याची पोलीस कस्टडी मंजूर करून घेऊन तपास केला. त्याच्याकडून घरगुती साहित्यासह आयशर ट्रक असा १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आणखी आरोपींचा शोध घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय देशमुख, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार समाधान तेलंग्रे, इर्शाद पटेल, वैभव खोकले, जतीन ओहोळ, मोहन हिवाळे, होमगार्ड मोबीन शोख, अस्लम शेख, जावेद दर्गेवाले, व्ही. ए. व्यवहारे, क्षीरसागर, गायकवाड यांनी केली.