राजूर परिसरात रस्ता सुरक्षा अभियान; संस्थेकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:10+5:302021-02-19T04:20:10+5:30
अलिकडे दिवसेंदिवस रस्ता वाहतुकीचे नियम माहित नसल्यामुळे तसेच वाहनचालकांच्या निष्काळीपणामुळे अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांचे बळी ...

राजूर परिसरात रस्ता सुरक्षा अभियान; संस्थेकडून जनजागृती
अलिकडे दिवसेंदिवस रस्ता वाहतुकीचे नियम माहित नसल्यामुळे तसेच वाहनचालकांच्या निष्काळीपणामुळे अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांचे बळी जात असून, काहींना कायमचे अपंगत्व येत आहे. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर पडत असून, ही चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी मदन बहुउददेशिय संस्थेने जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने चालवितांना रस्ता वाहतुकीचे नियम काय आहेत, वाहन चालविण्याअगोदर चालकाचे आरोग्य कसे असावे, पायी चालत असताना कोणते नियम आहेत, याविषयी जनजागृती करुन रहदारीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे फलक लावण्यात आले. त्याचबरोबर राजूर परिसरात चित्र रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पाँम्पलेट वाटप करण्यात आले. यामध्ये मदन बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एल.टी. मदन, संस्थेचे कर्मचारी दीपक गवळी, सहायक फौजदार शिवाजी देशमुख, जमादार जनार्दन भापकर, पोलीस नाईक गणेश मान्टे, स्वाती पंडीत, अविनाश गरड, बळीराम अंभोरे, तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे यांची उपस्थिती होती.
फोटो
राजूर येथे रस्ता वाहतुकीच्या जनजागृतीपर माहितीपत्रक वाटप करताना एल. टी. मदन, सहायक फौजदार शिवाजी देशमुख, जनार्दन भापकर, गणेश मान्टे, स्वाती पंडित, शिवाजी तायडे आदी.