रस्त्यावर अतिक्रमण; वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:14+5:302021-02-24T04:32:14+5:30
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अंबड : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील साहित्यासह इतर ...

रस्त्यावर अतिक्रमण; वाहतुकीची कोंडी
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
अंबड : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील साहित्यासह इतर मुद्देमाल लंपास केला जात आहे. यापूर्वी दाखल अनेक गुन्ह्यांचा उलगडा न झाल्याने नागरिकही तक्रारी देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
अरूंद रस्त्यावरील पूल ठरतोय धोकादायक
बदनापूर : बदनापूर ते जामखेड या अरूंद रस्त्यावर असलेला पूल धोकादायक ठरत आहे. यापूर्वी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अरूंद रस्ते, संरक्षक कठडे नसलेल्या पुलामुळे वाहनांचे अपघात झाले असून, अनेकांचे बळी गेले आहेत. ही बाब पाहताबदनापूर- जामखेड मार्गावरील पुलाची दुरूस्ती करावी, या मार्गावर सूचना फलक लावावेत, अशी मागणी वाहन चालकांमधून केली जात आहे.
आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशारा
जालना : मुस्लिम समाज आरक्षण हा विषय महत्त्वाचा असून, शासनाने या आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॅ. निसार अहमद देशमुख यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.