शहर विकास आराखड्यातील रस्ते अतिक्रमणाचा विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:48+5:302021-02-05T08:03:48+5:30
अंबड : शहरातील चांगलेनगर वस्तीतील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयाला वेढा घालून घरी जावे लागत ...

शहर विकास आराखड्यातील रस्ते अतिक्रमणाचा विळख्यात
अंबड : शहरातील चांगलेनगर वस्तीतील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयाला वेढा घालून घरी जावे लागत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
अंबड शहरातील चांगलेनगर भागातील रस्त्यावरच काही लोकांनी अतिक्रमण केल्याने, जालना- अंबड -वडीगोद्री रस्त्याच्या नव्याने होत असलेल्या नाली बांधकामामुळे, तसेच महावितरणच्या गुत्तेदाराने रस्त्यावरच डीपीचे पोल लावल्याने देखील चांगलेनगर येथील वस्तीत जाणाऱ्या सर्व रहिवाशांना रहदारीचा मुख्य रस्ता असताना देखील दूरवरून घरी ये-जा करावी लागत असल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी शिवप्रसाद चांगले, नवनाथ कुंडकर, शिवाजी भारजकर, विष्णू वरकड, संतोष लहामंगे, विजय जळके, संतोष चित्रे, अशोक लांडे, भाऊसाहेब आंधळे आदींची उपस्थिती होती.
२०० कुटुंब त्रस्त
शहर विकास आराखड्यातील रस्त्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याने चांगलेनगर तसेच श्रीकृष्णनगर भागातील २०० कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईच्या सूचना देऊनही पालिका दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय पाहता अतिक्रमणे हटवावीत.
शिवप्रसाद चांगले
गटनेते तथा नगरसेवक, अंबड