रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:44+5:302021-02-23T04:47:44+5:30
विस्कळीत वीजपुरवठा भोकरदन : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. विस्कळीत वीजपुरवठा होत असल्याने शासकीय, निमशासकीय कामावर ...

रस्त्याची दुरवस्था
विस्कळीत वीजपुरवठा
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. विस्कळीत वीजपुरवठा होत असल्याने शासकीय, निमशासकीय कामावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी होत आहे.
वाहतुकीची कोंडी
जालना : शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठेच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक वाहनचालक रस्त्यावर वाहने लावत असल्याने पादचारी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कारवाईची मागणी
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण तंट्यात वाढ होत असून, महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पळस फुलला
टेंभुर्णी : होळीच्या सणाला महिना अवकाश असला, तरी रानोमाळी फुलणारा पळस सध्या फुलला आहे. टेंभुर्णी परिसरातील पळसाची आकर्षक झाडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.