शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

परतीच्या पावसाचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:06 IST

बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / भोकरदन : बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. दरम्यान, या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. भोकरदन तालुक्यातील बेलोरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची एक बाजू पाण्यामुळे वाहून गेली आहे. तर जालना शहराला पाणीपुरवठा करणाºया घाणेवाडी प्रकल्पात ६ फुटांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला.जिल्ह्यात गत आठवड्यापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भोकरदन तालुक्यातील केळना, पूर्णा, गिरजा, रायघोळ, धामणा, जुई या सर्व नद्यांना पूर आला होता. तर बेलोरा येथील बंधा-याला सिंचन विभागाने गेट टाकलेले आहेत. त्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा बंधारा एका बाजूने वाहून गेला. त्यामुळे येथील शेतकरी दशरथ श्रीपत कोल्हे यांचे अर्धा एकर शेती वाहून गेली. तसेच गजानन सुखदेव कोल्हे, पंजाब सारंगधर बदर, रमेश शिंदे या तीन शेतकऱ्यांच्या बंधा-याच्या लगत नदीच्या काठावर असलेल्या विहिरी गाळामुळे गायब झाल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे १२ ते १५ लाख रूपयाचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.अभियंत्यांनी केली पाहणीबेलोरा बंधारा वाहून गेल्याची माहिती जलसंधारण विभागाचे उपअभियंता आऱ के़जाधव, अंबादास सहाने यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बेलोरा येथे जाऊन पाहणी केली.या मंडळांत झाली अतिवृष्टीजालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळात ८४ मिमी, विरेगाव ९४ मिमी, पचनवडगाव ६५ मिमी, वाघ्रूळ जहागीर ११० मिमी, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी ८० मिमी, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार ९५ मिमी, राजूर ७९ मिमी, केदारखेडा ८१ मिमी, अनवा १३० मिमी, परतूर महसूल मंडळात ७८ मिमी तर अंबड, वडीगोद्री महसूल मंडळात ९८ मिमी पाऊस झाला.‘खडकपूर्णा’तून ५८ हजार क्युसेसचा विसर्गतळणी : विदर्भातील खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आले असून, पूर्णा नदीपात्रात ५८ हजार ३१३ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक वाढल्याने मंठा तालुक्यातील पूर्णा नदीवरील पूर्णा पाटी, वझर सरकटे व उस्वद येथील कोल्हापुरी बंधा-यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बंधा-याच्या बाजूचा भराव वाहून जाण्याबरोबर शेतात पाणी घुसून शेतजमीन व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तिन्ही बंधा-यांची पाटबंधारे व मंठा तहसीलच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पाहणी केल्याचे उस्वद येथील माजी सरपंच राम चट्टे, वामन देशमुख, संतोष सरकटे, अशोक सरकटे यांनी सांगितले.जामवाडीनजीकच्या पुलाचा सापळा गेला वाहूनजालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी गावाजवळील हॉटेल युवराज जवळ नव्यानेच एक पूल बांधण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या पुलाचा सापळा वाहून गेला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे जालना ते देऊळगावराजा या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक नंतर सिंदखेड राजा आणि भोकरदन मार्गे वळविण्यात आली. पूल वाहून गेल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाडेकर यांनी जिल्हा प्रशासनाला कळविली. त्यानंतर खबरदारी घेण्यात आली.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी : बंधा-यावरील २० गेट काढलेकेदारखेडा : येथील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा मंगळवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाला. पाण्याचा वेग वाढल्याने बंधा-याचे पाणी शेजारील शेतशिवारात गेले. त्यामुळे या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. बंधा-याच्या पाण्याची धार नदीकाठावरील पंढरीनाथ तांबडे यांच्या शेतातून पडल्याने कपाशीसह जमिनीतील माती वाहून गेली.याची दखल घेत जलसंधारण खात्याच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी केदारखेडा कोल्हापुरी बंधा-याचे २० गेट काढले होते. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या बंधा-याची पाहणी केली. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर.के.जाधव, अंबादास सहाने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरDamधरणagricultureशेती