टेंभुर्णीत इस्लाम दर्शन पुस्तक प्रदर्शनास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:28+5:302021-02-05T07:59:28+5:30
टेंभुर्णी : इस्लामिक पब्लिकेशन ट्रस्ट द्वारा आयोजित इस्लाम दर्शन या पुस्तक प्रदर्शनास शुक्रवारी टेंभुर्णी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या ...

टेंभुर्णीत इस्लाम दर्शन पुस्तक प्रदर्शनास प्रतिसाद
टेंभुर्णी : इस्लामिक पब्लिकेशन ट्रस्ट द्वारा आयोजित इस्लाम दर्शन या पुस्तक प्रदर्शनास शुक्रवारी टेंभुर्णी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या एका मोबाईल व्हॅनद्वारे ही पुस्तके गावागावात प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध केली जात असल्याचे या ट्रस्टचे प्रमुख शेख मुसा यांनी सांगितले.
या प्रदर्शनात इस्लाम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ कुराणची दिव्य कुराण ही मराठी आवृत्ती उपलब्ध होती. याशिवाय प्रेषित मोहम्मदांच्या जीवन परिचयावर आधारित पुस्तकांसह इस्लाम व राष्ट्रीय एकात्मता, प्रेषितांचा मानवतावादी संदेश आदी अनेक पुस्तके मांडण्यात आली होती. मराठी, हिंदी आणि उर्दू अशा तिन्ही भाषेत पुस्तके उपलब्ध असल्याने वाचकांनी पुस्तके पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सध्या जमात ए इस्लामी हिंदतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या अंधारातून प्रकाशाकडे या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित राज्यव्यापी अभियानाची जनजागृतीही करण्यात आली. या फिरत्या पुस्तक प्रदर्शनासाठी ट्रस्टचे शेख मुसा, व्हॅनचालक नूर अली यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मुक्तारखा पठाण, इद्रीस खान, सय्यद सालेहोद्दीन, शारेख पठाण, शेख नसीम आदींनी पुढाकार घेतला.
फोटो
टेंभुर्णी येथील जुन्या बसस्थानकावर शुक्रवारी संपन्न झालेल्या पुस्तक प्रदर्शनात पुस्तके न्याहाळताना वाचक.