विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:41+5:302021-02-26T04:43:41+5:30
रस्ता कामास प्रारंभ अंबड : शहरातील पोलीस कॉलनी भागातील रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या भागातील रस्त्यांची मोठी ...

विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीस प्रतिसाद
रस्ता कामास प्रारंभ
अंबड : शहरातील पोलीस कॉलनी भागातील रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. रस्ता काम सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळत आहे.
राजा टाकळीतील ३० जणांची नेत्रशस्त्रक्रिया
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील ३० ग्रामस्थांची पुणे येथे नेत्र शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नेत्र शस्त्रक्रिया होणाऱ्या नागरिकांची सोमवारी रवानगी करण्यात आली. यावेळी सूर्यकांत आर्दड, रवींद्र आर्दड, सरपंच चंद्रकला आर्दड, उपसरपंच विष्णुपंत आर्दड, डिगांबर आर्दड, हनुमंत आर्दड, कैलास आर्दड, बबलू आर्दड, नारायण आर्दड, भागवत आर्दड आदींची उपस्थिती होती.
सामाजिक न्याय दिनानिमित्त कार्यक्रम
जाफराबाद : तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या वतीने जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील चव्हाण, सरकारी वकील ॲड. सपकाळ, आर. जे. वाघमारे, व्ही. पी. तांबेकर, वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. शरद सिरसाठ, सचिव ॲड. सचिन सोरमारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सूचना फलकांअभावी चालकांची गैरसोय
बदनापूर : जालना-बदनापूर महामार्गावरील अपघातात वाढ झाली आहे. धोकादायक ठिकाणी सूचना फलक, दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. शिवाय वाहन चालक, प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. वाढलेले रस्ता अपघात पाहता बांधकाम विभागाने लक्ष देऊन या महामार्गावर गरजेनुसार सूचना फलक, दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
धनगर आरक्षणासाठी जनजागृती मोहीम
घनसावंगी : धनगर समाज आरक्षणासाठी ठिकठिकाणी भेटी देण्यात येत आहेत. समाजाच्या आरक्षणासाठी जनजागृती मोहीम सुरू असल्याची माहिती ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दिली. देवीदहेगाव येथे रविवारी आयोजित बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी टेहळे व इतरांची उपस्थिती होती.