खनेपुरी गावात असंसर्गिक रोग शोधमोहिमेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:43+5:302021-08-28T04:33:43+5:30
खनेपुरी येथे डॉ. शिरीष, डाॅ. देशपांडे, डॉ. पवार, एस. व्ही. पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी सरपंच ...

खनेपुरी गावात असंसर्गिक रोग शोधमोहिमेस प्रतिसाद
खनेपुरी येथे डॉ. शिरीष, डाॅ. देशपांडे, डॉ. पवार, एस. व्ही. पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी सरपंच सुधाकर एडके यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच तुकाराम शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष जना गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पवार, भगवान टापरे, दत्ता आरेकर आदींची उपस्थिती होती. या मोहिमेत गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना कोणकोणते आजार आहेत का, शारीरिक त्रास आणि लक्षणे यासह इतर बाबींची माहिती घेण्यात आली. शिवाय कोरोनाच्या कालावधीत असंसर्गिक आजारापासून कशाप्रकारे आपली सुरक्षा करावी, याची माहितीही उपस्थित तज्ज्ञांकडून देण्यात आली. तसेच यावेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसनही पथकातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. कार्यक्रमास सोपान बाबर, संजय पवार, अशोक शिंदे, भगवान शिंदे, भगवान गायकवाड, पप्पू शेख, गणेश एडके, प्रकाश एडके, सूर्यभान गाढे यांची उपस्थिती होती. मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेविका गव्हाणे, आरोग्य सेवक डांगे, आशा वर्कर शमसाद बानो व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.