माहेश्वरी सभेच्या कार्यक्रमास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:35+5:302021-09-02T05:04:35+5:30

तीर्थपुरी येथील बालाजी मंदिरात सोमवारी बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किशन भन्साळी यांच्या अध्यक्षतेखाली ही ...

Response to Maheshwari Sabha program | माहेश्वरी सभेच्या कार्यक्रमास प्रतिसाद

माहेश्वरी सभेच्या कार्यक्रमास प्रतिसाद

तीर्थपुरी येथील बालाजी मंदिरात सोमवारी बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किशन भन्साळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय दाड, प्रदेश प्रसारण मंत्री ओमप्रकाश बजाज, अखिल भारतीय महासभेचे सदस्य विजय राठी, जिल्हा माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष सत्यनारायण सारडा, जिल्हा सचिव लक्ष्मीनारायण मानधना यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस देवीलाल बजाज, सत्यनारायण तोष्नीवाल, बद्रीनारायण भांगडिया, जुगलकिशोर चांडक, द्वारकादास अग्रवाल, सत्यनारायण लोहिया यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा तोष्नीवाल यांनी केले. प्रास्ताविक मनोज मानधाने यांनी तर आभार डॉ. साईप्रसाद लड्डा यांनी केले. यावेळी किशोर तोष्णीवाल, सचिन मानधाने, गुलशन मुंदडा, गोपाल बजाज, सचिन भांगडिया, उमेश लोहिया, मुकेश अग्रवाल, दीपक मुंदडा, रवी मानमे, गणेश बजाज, आदित्य मानधनी आदींची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Response to Maheshwari Sabha program