लायन्स क्लबच्या लसीकरण मोहिमेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:02+5:302021-04-06T04:29:02+5:30
येथील लायन्सचे पदाधिकारी पुरुषोत्तम जयपुरिया यांनी विनाशुल्क त्यांचे मधुब बॅक्वंट हॉल् यासाठी उपलब्ध करून दिला. या लसीकरण ...

लायन्स क्लबच्या लसीकरण मोहिमेस प्रतिसाद
येथील लायन्सचे पदाधिकारी पुरुषोत्तम जयपुरिया यांनी विनाशुल्क त्यांचे मधुब बॅक्वंट हॉल् यासाठी उपलब्ध करून दिला. या लसीकरण शिबिरास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन लायन्स क्लबच्या आयोजनासह पुढाकार घेतल्याचे ताेंडभरून कौतुक केले. अन्य संस्थानी देखील असाच पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जालना लॉयन्स परिवार व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण शिबीर घेण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला एकाच दिवसात तब्बल पाचशेपेक्षा अधिक नागरिकांनी मोफत लस घेतली.
यावेळी उपप्रांतपाल एम.जे.एफ. पुरुषोत्तम जयपुरिया, विजय बगडिया, सुभाष देवीदान, अतुल लड्डा, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी, दीपक भुरेवाल, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच, अरुण मित्तल, विनोद कुमावत, विनोद पवार, सतीश संचेती, राजेश लुणिया, किशोर गुप्ता, मोहन इंगळे, द्वारकादास मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
_________________
चौकट...!
जनजागृती व प्रसारासाठी उपक्रम : जयपुरिया
कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय कार्यात लसीबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, जास्तीत जास्त नागरिकांना लस घेता यावी याकरिता जनतेत जनजागृती व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याच उद्देशातून मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले. अशी भूमिका लॉयन्सचे उपप्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांनी यावेळी स्पष्ट केली.