शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गाळ उपशाला ग्रामस्थांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:37 IST

यंदा पर्जन्यमान कमी असल्याने भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण हिवाळ््यातच आटले होते. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता या धरणातून स्वत:हून गाळ शेतात नेऊन टाकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : यंदा पर्जन्यमान कमी असल्याने भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण हिवाळ््यातच आटले होते. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता या धरणातून स्वत:हून गाळ शेतात नेऊन टाकला आहे.लोकवर्गणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा या कामात वाढता उत्साह पाहून शासनाने देखील या ठिकाणी एक पोकलेन मशिन उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांना मदत केली. गेल्या दोन महिन्यांपासून या धरणातील गाळ उपसा रात्रं- दिवस सुरू असून एक शासकीय पोकलेन व सात खाजगी जेसीबीद्वारे गाळ उपसा करून शेतक-यांनी शेकडो टिप्पर गाळ शेतात नेऊन टाकला आहे.मागील आठवड्यापासून शेतातील कामे सुरू झाल्याने येथील जेसीबींची संख्या घटली आहे. यामुळे वेळेत टिप्पर भरत नसल्याने गाळ वाहतूक करणारी टिप्पर संख्या देखील रोडावली होती. परंतु, शेतक-यांची मागणी जास्त असून, त्यांना गाळ मिळेना. ही बाब शासनाच्या निर्दशनास ग्रामस्थांनी आणून दिली.ग्रामस्थांनी गाळ उपसा केलाविझोरा, वाढोणा, वडोद तांगडा, लेहा, शेलूद, पोखरी, धावडा, मेहगाळ, जळकी बाजार, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, करजगाव कल्याणी, आन्वा, कोदा, वालसावंगी, पारध खु., पारध बु. इ. गावातील ग्रामस्थ गाळ वाहतूक करत आहेत.शेती सुपीक होण्यास मदतशेलूद धरणात महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत गाळमुक्त धरण योजनेतून गेल्या दोन महिन्यांपासून गाळ उपशाचे काम सुरु आहे. पूर्वी शासनाचे एकच पोकलेन होते. आता आणखी एक पोकलेन उपलब्ध करुन दिल्याने गाळ उपशाला गती मिळाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेतक-यांची जमीन सुपीक होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पdroughtदुष्काळ