देखाव्यांना प्रतिसाद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:51 IST2018-09-19T00:51:17+5:302018-09-19T00:51:42+5:30
गणेश उत्सव आणि महालक्ष्मी सणानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक देखावे आणि सजावट करण्यात आली आहे.

देखाव्यांना प्रतिसाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गणेश उत्सव आणि महालक्ष्मी सणानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक देखावे आणि सजावट करण्यात आली आहे.
येथील वीरेंद्र बांगड हे गेल्या पंधरा वर्षांपासून संस्कृती या विषयावर देखावे सादर करतात. यंदा त्यांनी पर्यावरण आणि मानवी जीवन यावर देखावा सादर केला आहे. यात प्राचीन काळापासून मानवाच्या जिवनामध्ये झालेल्या बदलांचा सचित्र देखावा केला असून यातून तंत्र साधनाच्या मदतीमुळे माणूस आळशी बनला असून त्याचा त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. वातावरणातील बदल, दुष्काळ आणि त्यावरील उपाय यांनी देखाव्यातून सुचविले आहेत. दुसरी कडे रामदास कुलकर्णी यांनी स्वच्छ भारतचा देखाव्यातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अन्य नागरिकांनी देखील देखावे सादर करून गौर-गणपती आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरे केले आहेत. आनंदवाडी येथील रहिवासी जगन्नाथ ज्ञानदेव मुळे यांनी श्रीकृष्णाची रांगोळी हुबेहुब साकारली.