‘चला संवाद साधू या’ उपक्रमाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:43+5:302021-01-04T04:25:43+5:30
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी अंबड : महाराष्ट्र लोकसेवा आयोग व पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या निर्माण ...

‘चला संवाद साधू या’ उपक्रमाला प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी
अंबड : महाराष्ट्र लोकसेवा आयोग व पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी अभाविपच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर हरीष वाघमारे, आदित्य देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शौर्य दिनानिमित्त अभिवादन
जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शूरवीरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमोल खरात, राजू खरात, गोविंद खरात, अरुण खरात, दीपक म्हस्के, सचिन खरात, अमित खरात, विलास खरात यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
बलिदान दिनानिमित्त अभिवादन
जालना : नाभिक सेवा संघाच्या वतीने बलिदान दिनानिमित्त क्रांतिवीर भाई कोतवाल, क्रांतिवीर हिराजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गजानन वीर, सखाराम वाघमारे, रत्नाकर कुढेकर, आयुष सुरासे, अनिल परळकर, कैलास सोळंखे यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.