शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:42 AM

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस टी.पी. मुंडे हे होते. आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये जालना जिल्ह्यातील जालना आणि परतूर हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी सुटले आहेत. असे असताना काँग्रेसने पाचही विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.येथील हॉटेल अंबरमध्ये या मुलाखती पार पडल्या. प्रारंभी टी.पी.मुंडे यांचा सत्कार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी सभापती भीमराव डोंगरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. जालना विधानसभा मतदारसंघातून माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आर. आर. खडके, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, सत्संग मुंडे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करून मुलाखत दिली. घनसावंगी मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पवार यांनी एकमेव मुलाखत दिली. भोकरदन मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा एकमेव अर्ज आला असल्याचे टी.पी. मुंडे म्हणाले. बदनापूर या राखीव मतदारसंघातून दिनकर घेवंदे, अ‍ॅड. देविदास डोंगरे आणि रोहन लोखंडे यांनी मुलाखत दिली. परतूर मतदारसंघातून माजी आ. सुरेशकुमाार जेथलिया तसेच जिल्हा परिषद सदस्य राजेश राठोड यांनी अर्ज दाखल केला.यावेळी इच्छुकांनी त्यांनी पक्षासह समााजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा सादर करून निवडून येण्यासाठीची माहिती दिली. यावेळी माजी आ. धोंडीराम राठोड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राजेंद्र राख, बदर चाऊस, वसंत जाधव, राम सावंत, शेख सैय्यद, आनंद लोखंडे आदींची उपस्थिती होती. या मुलाखतींचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस