उमेदवारांकडून खर्चाचा अहवाल मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:16+5:302021-02-05T08:01:16+5:30

रस्त्याची दुरवस्था जालना : तालुक्यातील साळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले ...

Requested cost report from candidates | उमेदवारांकडून खर्चाचा अहवाल मागविला

उमेदवारांकडून खर्चाचा अहवाल मागविला

रस्त्याची दुरवस्था

जालना : तालुक्यातील साळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, दुर्लक्ष करण्यात आले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

घनसावंगी येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन

जालना : घनसावंगी येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग यांच्या वतीने घनसावंगी येथे गुरूवारी जागतिक कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शन घेण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन नगरसेवक नंदकुमार देशमुख यांच्या हस्ते होईल. यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुुख, सीताफळ शेती मार्गदर्शक रामेश्वर पडूळ आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने घेतला जनगणनेचा ठराव

जालना : तालुक्यातील पिरपिंपळगाव येथील ग्रामपंचायतीने २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनजणना करण्याचा ठराव घेतला आहे. ही ग्रामसभा सरपंच मनीषा कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याबाबत ठराव करावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

साष्टपिंपळगाव येथील आंदोलनास भेट

जालना : मराठा समाजास आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनास झुंजार छावा संघटनेचे सुनील काेटकर यांनी भेट दिली. मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळण्यासाठी आपला या आंदोलनास पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नीलेश डव्हळे, रवींद्र काळे, अरूण नवळे, किरण खरात, संतोष काळे, किशोर चव्हाण यांची उपस्थिती होती. शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणीही झुंजार छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली.

रोहिलागड परिसरात हुरडा पार्टी सुरू

जालना : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात सध्या ज्वारीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे यंदा शेतात हुरडा खाण्याची मेजवाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सध्या शेतकरी कुटुंबासह शहरातील नातेवाईक हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी शेतात जाताना दिसत आहेत. यंदा विहिरीत पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतातील रब्बी पिकेही बहरलेली आहेत. हुरडा पार्टीलाही वेग आला आहे.

अध्यक्षपदी तौर, तर सचिवपदी तिकांडे

जालना : यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. भागवत तौर, तर सचिवपदी श्रीहरी तिकांडे यांची निवड करण्यात आली. व्याख्यानमालेच्या आयोजनाबाबत संयोजन समितीची बैठक संजय खोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. याप्रसंगी डाॅ. मुरली जाधव, डाॅ. गोपाल अडाणी, लक्ष्मण पानखडे, राजेंद्र मुळे, उध्दव बाजड यांची उपस्थिती होती. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

पोषण आहार संघटनेचा तालुका मेळावा

जालना : घनसावंगी येथे शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्य सरचिटणीस मधुकर मोकळे, ॲड. अनिल मिसाळ यांची उपस्थिती होती. मुधकर मोकळे म्हणाले, शालेय पोषण आहार कर्मचारी देशातील कुपोषण संपवण्याचे काम करत असून, सरकारचे धोरण मात्र पोषण आहार कर्मचाऱ्यांना कुपोषित करण्याचे काम करीत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत

अंबड : शहरासह ग्रामीण भगात बुधवारी शाळेची घंटा वाजली. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी अगदी फुलून गेला होता. पाचवी ते आठवी इयत्तेच्या तासिका सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. बैठक व्यवस्था करताना अंतर ठेवण्यात आले होते. अंबड शहरातील मत्स्योदरी विद्यालयात मुख्याध्यापक पांडुरंग घोगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Requested cost report from candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.