जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:55+5:302021-02-05T08:05:55+5:30

जालना : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन, ...

Republic Day festivities in the district | जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

जालना : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मंगळवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन, गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. शिवाय काही ठिकाणी विविध उपक्रमही राबविण्यात आले.

राजकुंवर विद्यालय, धावडा

धावडा : येथील राजकुंवर विद्यालयात प्राचार्य करणसिंग चुंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामसंसद कार्यालय, धावडा

धावडा : येथील ग्रामसंसदच्या नूतन कार्यालयात तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, युवराज सानप, पशुधन पर्यवेक्षक राजूरकर, पं.स. सदस्य प्रभाकर मोकासरे, माजी सरपंच बेलाअप्पा पिसोळे, माजी सरपंच रामभाऊ लांडगे, माजी उपसरपंच प्रवीण गांधिले, नूतन ग्रामपंचायत सदस्य इकबाल पठाण, दिलीप वाघ, शेणफड देवकर, ईश्वर सपकाळ, सय्यद रशीद, रामराव पवार, ज्ञानदेव निकाळजे, दीपक देशमुख, सुरेश मोकासरे, नानासाहेब देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

भोयारेश्वर विद्यालय, वाढोणा

धावडा : भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील महर्षी भोयारेश्वर माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक भिकाजी इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य गणेश इंगळे, रामभाऊ तायडे, नारायण गवळी, अशोक गवळी, रोहिदास चिकटे, डॉ. दीपक तायडे, रामदास पवार, अंकुश पाडले यांच्यासह प्राध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सहशिक्षक वसू यांनी तर आभार जाधव यांनी मानले.

दीपभारती विद्यालय, वडोदतांगडा

धावडा : भोकरदन तालुक्यातील वडोदतांगडा येथील दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक व्ही. ए. तांबेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक एस.टी. कर्वे, एम. पी. पांडे, आर. जी. खरात, एस. के. भांबळे, एस. पी. रगडे, एस. एस. गवळी, आर. के. लुटे, एस. आर. तांगडे, म्हस्के आदींची उपस्थिती होती.

Web Title: Republic Day festivities in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.