महाविद्यालयात प्रजासताक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:49+5:302021-02-05T08:00:49+5:30

रस्त्याची दुरवस्था जालना : तालुक्यातील बाजीउम्रदकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड ...

Republic Day celebrations at the college | महाविद्यालयात प्रजासताक दिन साजरा

महाविद्यालयात प्रजासताक दिन साजरा

रस्त्याची दुरवस्था

जालना : तालुक्यातील बाजीउम्रदकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली, परंतु दुर्लक्ष करण्यात आले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात ध्वजारोहण

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ.राहुल बोने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.रोहित चव्हाण, डॉ.गौतम खिल्लारे, आरोग्य सहायक बी.बी. गायकवाड, आर.जी. मोरे, एस. के. गुळवे, व्ही.एच. लाड, बी. जी. खरात, पी. एम. शेख, एस.बी. गाढेकर, ऐ.डी. पगारे, डी.जी. मुलगे, एस.एम. देशमाने, एस.आर. खरात, एस.डी. दळवी, पी.आर. आघाव, औषध अधिकारी एम.के. देशमुख, एच.एन. टरले व डी.बी. उबाळे यांची उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य राम सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, शाम खोडे, आकृत तिडके यांच्यासह हरीओम साबळे, उध्दव चव्हाण, अंकृश मोहिते, कुंडलिक तिडके, संतोष भाकड आदींची उपस्थिती होती.

खडी रस्त्यावर पडल्याने वाहनधारकांचे हाल

जालना : जालना शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या बायपास मार्गाचे सिमेंटीकरण करून दुभाजकांमध्ये फुलांची झाडे लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कन्हैयानगरकडे असलेल्या मार्गाचे बहुतांश काम झाले, परंतु अंबड, मंठा चौफुली मार्गाचे काम संथगतीने होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

घनसावंगी येथील कृषी प्रदर्शनास प्रतिसाद

घनसावंगी : येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यत्मिक विकास मार्ग यांच्या वतीने घनसावंगी येथे गुरुवारी जागतिक कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी केले. तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रामेश्वर पडूळ, दीपक बोनगे, नानाभाऊ उगले, राजेश कोल्हे, आविनाश भुतेकर, राम जाधव, ऋषी पितळे आदींची उपस्थिती होती. यावेळी अवाना जलसिंचनाच्या आधुनिक पाण्याच्या टाकीचे वैशिष्ट्य प्रतिनिधी अविनाश भुतेकर यांनी सांगितले.

आष्टीत आश्वासनानंतर उपोषण मागे

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात सुरू असलेले अ‌वैध धंदे तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी बळीराम कडपे, जिल्हाध्यक्ष सुरेश खंडागळे यांची उपस्थिती होती.

डोंगरगाव येथे निधी संकलनासाठी मिरवणूक

जालना : श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम प्रभूच्या मंदिर बांधकामासाठी निधी संकलन करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे मिरवणूक काढण्यात आली होते. महिला भगिनींनी घरासमोर रांगोळ्या काढून मिरवणुकीचे उत्साहात स्वागत केले. यावेळी सरपंच विष्णू घनघाव, बबन घनघाव, रामेश्वर घनघाव, भास्कर घनघाव, रंजित शिनगारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती संभाजी विद्यालयात स्वागत

भोकरदन : तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य संजय पैठणकर, डी.बी. ठाकरे, के.व्ही. फुके, पी.एम. पाटील, व्ही.बी. कल्याणकर, अंकुश जाधव, राजेंद्र डेढवाल, कमल सोनवणे, जे.एच. सुरासे, एम.बी. भंडारे, एच.यू. गव्हाड यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शाळेचे चित्रकला स्पर्धेत यश

वडीगोद्री : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बारसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. गौरव सुळे याने प्रथम क्रमांक पटकावला. आरती मोढेकर हिने द्वितीय आणि गायत्री सुरेश घोडके या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Republic Day celebrations at the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.