जिल्ह्यात ४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:12+5:302021-02-20T05:28:12+5:30
जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा गुरूवारी मृत्यू झाला. तर गुरूवारीच ४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

जिल्ह्यात ४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा गुरूवारी मृत्यू झाला. तर गुरूवारीच ४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १३ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ३०१ वर गेली असून, आजवर ३७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ६२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना शहरातील ३१, तर तालुक्यातील तुपेवाडी येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा तालुक्यातील लवंगी १, हिवरखेडा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परतूर शहरातील १ तर वाटुर फाटा येथील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड शहरातील तिघांना कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद शहरातील १ तर तालुक्यातील सावरखेडा १, निवडुंगा १, वरखेडा १, ढोलखेडा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भोकरदन शहरातील दोन तर बुलडाणा जिल्ह्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली.