जिल्ह्यात ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:03+5:302021-02-11T04:33:03+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८ जणांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर बुधवारीच ३२ जणांचा अहवाल ...

जिल्ह्यात ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८ जणांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर बुधवारीच ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ९७१ वर गेली असून, आजवर ३७२ जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत १३ हजार ४०० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना शहरातील ९, तर खरपुडी येथील एकाला कोरोनाची बाधा झाली. परतूर शहरातील १, तर तालुक्यातील रायगव्हाण १, वाटूर फाटा येथील एकाला कोरोनाची लागण झाली. घनसावंगी शहरातील १, तर मानेपुरी १, सोनक पिंपळगाव येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अंबड शहरातील १, तर बदनापूर तालुक्यातील वरूडी येथील एक, चिखली दाभाडी येथील एकाला कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील एकाला कोरोनाची लागण झाली. भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ३, राजूर १, केदारखेडा १, तर बुलडाणा जिल्ह्यातील ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.