जिल्ह्यात ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:03+5:302021-02-05T08:00:03+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला, तर शनिवारीच ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...

जिल्ह्यात ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला, तर शनिवारीच ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार २७० वर गेली असून, आजवर ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १३ हजार १५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील आठजणांना कोरोनाची लागण झाली. मंठा शहरातील दोन, तर तालुक्यातील झेड.पी. वाघल १, किरला १, बेलोरा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. अंबड शहरातील ४, तर तालुक्यातील नंदी १, शहागड येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बदनापूर शहरातील १, तर भरडखेडा येथील एकास कोरोनाची लागण झाली. जाफराबाद तालुक्यातील जवखेडा १, सावरखेडा १, अकोलादेव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. भोकरदन शहरातील १, तर तालुक्यातील थिगळखेडा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बुलढाणा जिल्ह्यातील पाचजणांना कोरोनाची बाधा झाली.