जिल्ह्यात २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:58+5:302021-02-09T04:33:58+5:30

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा सोमवारी मृत्यू झाला. तर सोमवारीच २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

Reports of 20 people in the district are positive | जिल्ह्यात २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा सोमवारी मृत्यू झाला. तर सोमवारीच २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यशस्वी उपचारानंतर २३ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ९०० वर गेली असून, आजवर ३७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ३७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जालना शहरातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली. परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात २० हजार १०५ जण संशयित आहेत. सोमवारी २०३ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Web Title: Reports of 20 people in the district are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.