जिल्ह्यात ४२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:41+5:302021-03-31T04:30:41+5:30

बाधितांमध्ये जालना शहरातील २२४ तर तालुक्यातील नाव्हा १, घोडेगाव २, भिलपुरी १, चंदनझिरा २, चिखली १, दहिफळ १, दरेगाव ...

The report of 424 people in the district is positive | जिल्ह्यात ४२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ४२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

बाधितांमध्ये जालना शहरातील २२४ तर तालुक्यातील नाव्हा १, घोडेगाव २, भिलपुरी १, चंदनझिरा २, चिखली १, दहिफळ १, दरेगाव ३, डोंगरगाव १, घाणेवाडी १, जामवाडी १, खरपुडी २, मौजपुरी ३, मोतीगव्हाण १, नागेवाडी १, राममूर्ती २, सिरसवाडी १, सोनदेव १, उटवद १, वाघ्रुळ १, वखारी १, वानडगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा शहरातील ४, पठाडा १ तर परतूर तालुक्यातील परतूर शहर ९, आष्टी ५, कारळा ५, लि. पिंप्री येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा १, हादगाव १, कुंभारपिंपळगाव ३, रामसगाव १, मंगरुळ ख. १ तर अंबड तालुक्यातील अंबड शहर १२, बक्षीचीवाडी ३, चिकनगाव १, देशगव्हाण १, जामखेड ३, लालवाडी तां १, रोहिलागड २, शहागड १, सौंदलगाव ३, वडीगोद्री १, बेलगाव १, खंभेवाडी १, दहिपुरी येथील एकास कोरोनाची लागण झाली.

बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर १६, केळीगव्हाण २, बावणेपांगरी ५, दादावाडी ३, नजीकपांगरी १, मानदेवलगाव २, मांडवा ६, म्हसला १, रामखेडा १, सेलगाव ८, उज्जैनपुरी २, लोंढेवाडी १, तुपेवाडी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद शहर १, आंळद १, नलवीरा १, पिंपळगाव १, वरुड १ तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर २३, अलापूर १, दानापूर २, गोशेगाव १, कल्याणी २, राजूर ५, सोयगाव देवी २, वजीरखेडा १, वालसावंगी येथील दोघांना कोरोना बाधा झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील १, बुलडाणा ९, बीड १, परभणी येथील चार जणांना कोरोनाची लागण झाली.

जिल्ह्यात आजपर्यंत ४८९ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आजवर २५ हजार ८६९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यातील ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील उपचारानंतर २२ हजार ०८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. संस्थात्मक अलगीकरण केंद्रात १२६ जणांना ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक २, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक १०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक ४१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक ५, शासकीय तंत्रनिकेतन अंबड ४१, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर ८१ तर घनसावंगी येथील के.जी.बी.व्ही. येथे १८ जणांना ठेवण्यात आले आहे.

Web Title: The report of 424 people in the district is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.