जिल्ह्यात ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:31+5:302021-02-10T04:31:31+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा मंगळवारी मृत्यू झाला, तर मंगळवारीच ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यशस्वी ...

जिल्ह्यात ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा मंगळवारी मृत्यू झाला, तर मंगळवारीच ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यशस्वी उपचारानंतर १३ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ९३९ वर गेली असून, आजवर ३७२ मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १३ हजार ३९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना शहरातील २४, तर तालुक्यातील धारकल्याण येथील एकास कोरोनाची लागण झाली. मंठा तालुक्यातील किराळा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. अंबड शहरातील चार, तर काटखेडा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बदनापूर शहरातील दोन, तर तालुक्यातील भरडखेडा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील एकास कोरोनाची बाधा झाली. भोकरदन तालुक्यातील राजूर येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात २० हजार ११८ संशयित रुग्ण आहेत. त्यापैकी मंगळवारी ३६६ जणांच्या लाळेच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.