२३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:04+5:302021-01-13T05:21:04+5:30

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा मंगळवारी मृत्यू झाला. मंगळवारीच २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ...

Report of 23 people is positive | २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

२३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा मंगळवारी मृत्यू झाला. मंगळवारीच २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १८ जणांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ३९५ वर गेली असून, आजवर ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ८७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बाधितांमध्ये जालना शहरातील ७ तर तालुक्यातील दरेगाव १, नेर १, वंजार उम्रद येथील एकास कोरोनाची बाधा झाली. परतूर शहरातील २ तर तालुक्यातील खंदारी २, श्राष्टी १, शेलवाडी येथील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड शहरातील २ तर तालुक्यातील वरडी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बदनापूर तालुक्यातील मांडवा १ तर जाफराबाद शहरातील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील १ तर औरंगाबाद येथील एकास कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात १९ हजार ५५९ जण संशयित आहेत. मंगळवारी ३२० जणांच्या लाळेची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७८ स्वॅब निगेटिव्ह आले तर २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परतूर येथील अलगीकरण कक्षात एकास ठेवण्यात आले आहे.

Web Title: Report of 23 people is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.