जिल्ह्यात १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST2021-06-16T04:39:48+5:302021-06-16T04:39:48+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला, तर १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ...

जिल्ह्यात १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला, तर १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे शिवाय, कोरोनामुक्त झालेल्या १९ जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
बाधितांमध्ये जालना तालुक्यातील जालना शहर २, पानशेंद्रा २, चंदनपूर १, भ. तळगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा तालुक्यातील करनावळ १, पांडुणी १ तर घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव १, यावलपिंपरी येथील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड तालुक्यातील लोणार भायगाव १, दहयाला १, नालेवाडी १, गोंदी २, भणंग जळगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औरंगाबाद जिल्ह्यातील एकास कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात १६ जण संस्थात्मक अलगीकरणात आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक ४, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड २, शासकीय तंत्रनिकेतन अंबड ७, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी येथे दोघांना ठेवण्यात आले होते.
जिल्ह्यात कोरोनाचे ३४४ रुग्ण सक्रिय
जिल्ह्यात सध्या ३४४ सक्रिय रुग्ण आहेत. बाधित रुग्णांवर अलगीकरणासह रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजार ८१४ वर गेली असून, त्यातील ११२३ जणांचा मृत्यू झाला आहे तर, ५९ हजार ३४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.