१५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:35+5:302021-01-08T05:41:35+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४८ जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले. सोमवारीच १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

१५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४८ जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले. सोमवारीच १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार २५२ वर गेली असून आजवर ३५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ६६० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मंठा शहरातील १ तर परतूर शहरातील एकास कोरोनाची लागण झाली. घनसावंगी तालुक्यातील दोदडगाव २, बालखेड येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. भोकरदन तालुक्यातील देऊळगाव २, पिंपळगाव सुतार येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बुलडाणा जिल्ह्यातील २ तर औरंगाबाद येथील एकास कोरोनाची बाधा झाली आहे.