१३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:14+5:302021-01-18T04:28:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या १८ जणांना रविवारी यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर रविवारी ...

१३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या १८ जणांना रविवारी यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर रविवारी आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ४६५वर गेली असून, आजपर्यंत ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १२ हजार ९२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
रविवारी अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये जालना शहरातील ७ जणांचा समावेश असून, परतूर शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. घनसावंगी शहरातील १ तर अंबड शहरातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १, नांदेड येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात १९ हजार ६२३ जण संशयित असून, रविवारी ३०४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी २७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परतूर येथील अलगीकरण कक्षात दोघांना ठेवण्यात आले आहे.