१२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:19+5:302021-01-08T05:42:19+5:30

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा गुरुवारी मृत्यू झाला. गुरुवारीच १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ...

Report of 12 people is positive | १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

१२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा गुरुवारी मृत्यू झाला. गुरुवारीच १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उपचार घेणाऱ्या ४० जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ३०३ वर गेली असून, आजवर ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ७४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बाधितांमध्ये जालना शहरातील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील एकास कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात १९ हजार ४४७ जण संशयित आहेत. गुरुवारी २९२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २७८ अहवाल निगेटिव्ह आले, तर १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संस्थात्मक अलगीकरण कक्षात एकास ठेवण्यात आले आहे.

Web Title: Report of 12 people is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.