रूग्णांचे नातेवाईक ओढतात ‘स्ट्रेचर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:00 AM2019-07-25T01:00:50+5:302019-07-25T01:01:57+5:30

नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते. असेच चित्र बुधवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात दिसून आले.

Relatives of patients carry 'stretcher' | रूग्णांचे नातेवाईक ओढतात ‘स्ट्रेचर’

रूग्णांचे नातेवाईक ओढतात ‘स्ट्रेचर’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वेदनेने विव्हळणारे अनेक रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, रूग्णवाहिकेतून येणाऱ्या रूग्णांना स्ट्रेचरद्वारे डॉक्टरांकडे नेण्याची जबाबदारी काही वेळा कर्मचारी पार पाडत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागते. असेच चित्र बुधवारी दुपारी जिल्हा रूग्णालयात दिसून आले.
अपघात, मारहाणीतील जखमींसह विविध आजारांनी ग्रासलेले शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात दैनंदिन उपचारासाठी येतात. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाºया रूग्णांना अतिदक्षता विभागात नेण्यात येते. मात्र, रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर १०८ रूग्णवाहिकेतून रूग्ण आला तरी कर्मचारी स्ट्रेचर घेऊन जात नसल्याचे चित्र आहे. बुधवारी दुपारी १.४१ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार जिल्हा रूग्णालयात दिसून आला. एका जखमी रूग्णाला रूग्णवाहिकेतून (क्र.एम.एच.१४- सी.एल.११३५) उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. १०८ रूग्णवाहिका आली म्हटलं की, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर घेऊन रूग्णाला अतिदक्षता विभागात नेण्यासाठी पुढं येणे अपेक्षित आहे. मात्र, कोणी कर्मचारी संबंधित रूग्णाला घ्यायला पुढे आला नाही. त्यानंतर जखमीच्या एका नातेवाईकानेच स्ट्रेचर बाहेर आणले. रूग्णवाहिकेतून बाहेर पडण्यासाठी रूग्णाला साधारणत: सात ते आठ मिनिटे लागली. तोपर्यंत स्ट्रेचर उन्हाने तापून गरम झाले होते. रूग्णाने स्ट्रेचवर हात ठेवला आणि ते पोळू लागले. त्यामुहे तो स्ट्रेचवर एका बाजूला बसून राहिला. मात्र, १०८ च्या कर्मचाºयाने ‘स्ट्रेचर पडेल, तुम्ही झोपा’ असा सल्ला दिला. मात्र, स्ट्रेचवर बेडशिट नसल्याने व ते पोळू लागल्याने रूग्णाने त्यावर झोपण्यास नकार दिला. तेथे उपस्थित एका वयोवृध्द महिलेने हातातील ओढणी स्ट्रेचवर टाकल्यानंतर तो रूग्ण स्ट्रेचरवर झोपला. नातेवाईकांची कसरत पाहून १०८ च्या कर्मचा-यानेच स्ट्रेचर ओढण्यासाठी नातेवाईकांना मदत केली आणि रूग्णाला अतिदक्षता विभागात दाखल केले.

सलाईनची बाटली नातेवाईकांच्या हातात
संबंधित रूग्णाला रूग्णवाहिकेतून खाली उतरण्यासाठी साधारणत: आठ मिनिटे लागली. त्यानंतर नातेवाईकांनीच स्ट्रेचर आणले. विशेष म्हणजे, रूग्णवाहिकेतून रूग्ण खाली उतारल्यापासून तो रूग्ण अतिदक्षता विभागात जाईपर्यंत महिला नातेवाईकाला सलाईनची बाटली हातात धरून ठेवावी लागली.
सततच घडतात असे प्रकार
उपस्थित काही नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. रूग्णालयात अनेकवेळा असे प्रकार घडत आहेत.
रूग्ण वेदनेने व्हिळत असतो आणि कर्मचारी त्याला घेण्यासाठी स्ट्रेचर आणत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागत असल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या.

Web Title: Relatives of patients carry 'stretcher'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.