शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहारी जेवण देण्यास नकार; चिडलेल्या शेजाऱ्याने केला वृद्धाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 11:42 IST

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे

कुंभार पिंपळगाव : मांसाहारी जेवण देण्यास नकार दिल्याने शेजाऱ्यानेच वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रूक येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मारुती नरोटे (वय ६५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी पांडुरंग ज्ञानदेव हांगे (३०) याला अटक केली आहे. 

पिंपरखेड बुद्रूक गावातील मारुती नरोटे हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलगा राजाभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांच्यासोबत जेवत होते. ९ वाजेच्यासुमारास शेजारी राहणारा पांडुरंग ज्ञानदेव हांगे हा दारू पिऊन तेथे आला. त्याने नरोटे यांना मांसाहारी जेवण मागितले. परंतु, त्यांनी जेवण देण्यास नकार दिल्याने आरोपी पांडुरंग हांगे याने राजाभाऊ नरोटे यांच्या डोक्यात लोखंडी फुकणी मारली. मारुती नरोटे व पुतण्या होनाजी नरोटे हे त्याला बाजूला करण्यासाठी केले असता, त्याने त्यांनाही मारहाण केली. यात मारुती नरोटे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. याची माहिती सोमवारी सकाळी घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृताची पत्नी सुशीलाबाई नरोटे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी सकाळी घनसावंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अटकेतसंशयित आरोपी पांडुरंग ज्ञानदेव हांगे हा घटनास्थळावरून फरार झाला होता. सोमवारी दुपारी तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांना त्याला घरातून ताब्यात घेतले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे, बाबासाहेब हरिचंद्रे, पोहेकॉ. श्यामसुंदर देवडे, पोना. रामदास केंद्रे, पोकॉ. सुनील वैद्य, पोकॉ. बाळासाहेब मंडलिक, पोकॉ नवनाथ राऊत, पोकॉ. नारायण घुनावत आदींनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद