वंजारवाडी शिवारात कुंटणखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:00 IST2018-01-05T00:59:59+5:302018-01-05T01:00:02+5:30

वंजारवाडी शिवारातील गायरानात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून दोन बंगाली तरुणंीसह अन्य दोन महिलांना ताब्यात घेतले.

Red on brothel | वंजारवाडी शिवारात कुंटणखान्यावर धाड

वंजारवाडी शिवारात कुंटणखान्यावर धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील वंजारवाडी शिवारातील गायरानात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून दोन बंगाली तरुणंीसह अन्य दोन महिलांना ताब्यात घेतले. कुंटणखाना चालविणा-या दोन महिलांचा यात समावेश असून, दोन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, बदनापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक निरीक्षक दिलीप जगदाळे, उपनिरीक्षक अविनाश नाळेगावकर यांनी दुपारी साडेतीन वाजता गायरान जमिनीवरील शेडवर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एकवीस व तीस वर्षीय दोन तरुणींसह दोन आंटींना ताब्यात घेतले. कारवाईत त्यांच्याकडून २,३१० रुपये जप्त करण्यात आले. या वेळी पोलिसांनी दोन ग्राहकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी शेख इम्रान शेख बन्नू (रा.खासगा, ता. जाफराबाद) सुभाष भावराव ठाकरे (३०,रा. तडेगाव, ता. भोकरदन) यांच्यासह अन्य दोन महिलांवर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Red on brothel