जालना जिल्हा जलतरण असोसिएशनला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:12+5:302021-03-22T04:27:12+5:30
यासंदर्भातील माहिती जालना जिल्हा स्वीमिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राऊत यांनी दिली. महाराष्ट्र स्वीमिंग असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी ...

जालना जिल्हा जलतरण असोसिएशनला मान्यता
यासंदर्भातील माहिती जालना जिल्हा स्वीमिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राऊत यांनी दिली. महाराष्ट्र स्वीमिंग असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी ठाणे येथे संपन्न झाली. महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी जयप्रकाश दुबळे, जुबीन अमारिया, संभाजी भोसले, नीता तळवळकर, अभय देशमुख यांच्यासह या बैठकीत राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील स्वीमिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या जालना जिल्हा स्वीमिंग असोसिएशनने शालेय तसेच जिल्हास्तरावर कुमार, किशोर आणि खुल्या गटांत स्पर्धा घेऊन जलतरण क्षेत्रात आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. त्याचा कार्य अहवाल या बैठकीत राऊत यांनी सादर केला होता. त्यानंतर ही मान्यता मिळाल्याचे ते म्हणाले. या बैठकीस सचिव संजय देठे हेही हजर होते. दरम्यान, आता भविष्यात जालना जिल्ह्यात उत्कृष्ट जलतरणपटूंना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही राऊत यांनी नमूद केले.