शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:13 IST

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी भाजपच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे राजकारण म्हटले की मिलीजुली सरकार, असा सर्वत्र समज पसरला आहे. आणि तो काही अंशी खरा देखील आहे. येथे कोणताच राजकारणी कोणाचे उणे-दुणे काढत नाही. जियो और जीने दो या तत्त्वानुसार जालन्याच्या राजकारणाची दिशा असल्याने अनेक महत्वाच्या मुद्यावर ना विरोधक सडकून टीका करत ना सत्ताधारी विरोधकांची लक्तरे वेशीवर टांगत. त्यामुळे शहरातील कोट्यवधी रूपये खर्च होऊन सुरू असलेल्या कामांच्या दर्जावर त्याचा परिणाम सर्वसामान्यांना दिसतो. परंतु आपला मुद्दा उचलणारे नेतृत्व नसल्याने चलता है.. म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एक ते दीड तास जालन्यात आले होते. त्यांना दिल्लीला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी भाजपच्या सर्व नगरसेवकांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी जवळपास सर्व नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच गेल्या चार ते पाच वर्षात आपण विविध योजनेतून शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणला. परंतु काही नगरसेवकांनी हा निधी खर्च करतांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्याशी जुळवून घेतल्याची चर्चा आहे.तसेच त्यांना हवे तसे प्रस्ताव तयार करून घेऊन निधी मिळवून घेतल्याचे आपल्या लक्षात आल्याचे दानवेंनी सांगत आपण गोट्या खेळत नसल्याचे सांगितले.एकूणच या दानवेंच्या रौद्र रूपाने नगरसेवकांना घाम न फुटल्यास नवल. पालिकेतील विविध मुद्यांवरून सध्या प्रश्न गाजत आहेत. या कडे लक्ष देण्यासह हे सर्व मुद्दे तयार करून घेऊन नगरविकास विभागाच्या सचिवांकडे ते द्यावेत जर त्यात काही गौडबंगाल असेल त्याची चौकशी आपण लावू, अशी स्पष्ट भूूमिकाही त्यांनी घेतली. विशेष म्हणजे जालन्याची नगर पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात असल्याने युतीचे नेते अर्थात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दक्ष आहेत.खोतकर यांनी जालना पालिकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच नेते आपले अस्तित्व पणाला लावत असल्याचे दिसून येते. आपल्या अल्पशा विश्राम काळात केंद्रीय मंत्री जाम चिडल्याने नगरसेवकांमध्ये चर्चेला उधाण आले होते.विशेष म्हणजे, यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही दानवेंनी चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा भाजपमध्येच दबक्या आवाजात चर्चिली जात आहे.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेJalana Muncipalityजालना नगरपरिषदPoliticsराजकारणBJPभाजपा