शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंची रणनीती यशस्वी; रामेश्वर कारखान्यासाठी विरोधकांनी अर्जच दाखल केले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 19:24 IST

यावेळच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काही जुन्या संचालकांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

- फकिरा देशमुखभोकरदन : तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी केवळ २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नाहीत. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. 

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ऊस उत्पादक गट व राखीव मतदारसंघातील २१ जागांसाठी २३ जणांचे अर्ज आले. यात केवळ टेंभुर्णी ऊस उत्पादक गटातील ३ जागेसाठी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुक बिनविरोध होऊ शकली नाही. या निवडणुकीत आमदार संतोष दानवेसह १८ उमेदवारांचेच अर्ज दाखल आहेत. यामुळे यांची निवड बिनविरोध जाहीर करण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. 

यावेळच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काही जुन्या संचालकांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची २० जून रोजी छाननी होणार आहे. २१ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दयानंद जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक संजय भोईटे, बी. आर. गिरी, डी. डी. बावस्कर, बी. टी. काकडे, एस. टी. रोठगे हे काम पाहत आहेत.

यांचे एकमेव अर्ज दाखल: - राजूर गटात गणेश फुके, विजय वराडे, कमलाकर साबळे, - भोकरदन गटातून दादाराव राऊत, प्रकाश गिरणारे, मधुकर तांबडे- पिंपळगाव रेणुकाई गटातून भगवान सोनुने, पंडित नरवडे, अशोक लोखंडे,- जाफराबाद गटातून सुरेश परिहार, आत्माराम चव्हाण, महादू दुनगहू, - टेंभुर्णी गटातून जगन बनकर, माधवराव गायकवाड, कौतिकराव वरगणे, जगन वरगणे, श्रीराम गाडेकर, - सहकारी संस्था मतदारसंघातून आमदार संतोष दानवे, - अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून रामराव हिरेकर, - महिला मतदारसंघातून शोभा मतकर, तान्हाबाई भागीले, - इतर मागासवर्गीय मतदार संघातून विलासराव आडगावकर, - विमुक्त जाती-जमाती मागास प्रवर्गातून सुरेश दिवटे

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेJalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवे