शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रावसाहेब दानवे वॉचमनच्या मुलाच्या लग्नानिमित्त 'शेफ' बनले; पाहुण्यांना पोहे बनवून वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:19 IST

घरचे लग्न असल्यासारखे रावसाहेब दानवे यांनी सर्वसूत्रे घेतली हाती. पोहे बनवले आणि पाहुण्यांना वाढले देखील.

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना) : बंगल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या मुलाच्या विवाह असल्याने माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे थेट फत्तेपुर गावात आज सकाळीच ( दि. २५) ८ वाजता पोहचले. यावेळी रितीनुसार मांडव टाकण्यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी खास पोहे तयार केले. विशेष म्हणजे, घरचे लग्न असल्यासारखे दानवे यांनी पोहे पाहुण्यांना वाढले देखील. यामुळे दानवे यांच्या साधेपणाची पुन्हा प्रचिती येऊन मांडवात याचीच चर्चा रंगली होती.

माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या बंगल्यावर समाधान गायकवाड ( रा. फत्तेपुर ता भोकरदन) हे गेल्या २५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आज त्यांचा मुलगा दिपक गायकवाड याचा दहीगाव ( ता भोकरदन) येथील कविता शेणफड कानडजे हीच्यासोबत विवाह होता. त्या निमित्ताने गायकवाड यांच्या फत्तेपुर येथील घरी रितीनुसार मांडव टाकण्याचा कार्यक्रम आज सकाळी सुरू होता. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मॉर्निग वॉकवरून थेट फत्तेपूर येथे दाखल झाले. नवरदेव आणि गायकवाड कुटुंबियांची विचारपूस केल्यानंतर माजी मंत्री दानवे यांनी सर्व सूत्र हाती घेत मांडव टाकण्याच्या कार्यक्रमात उपस्थितीत पाहुण्यांसाठी पोहे तयार करण्यास घेतले. इतकेच नाही तर दानवे यांनी पाहुण्यांना पोहे वाटप करून स्वतः देखील त्यावर ताव मारला. 

खूप आनंदाचा क्षणयावेळी वरपिता समाधान गायकवाड म्हणाले की,  मी अनेक वर्षांपासून माजी मंत्री दानवे यांच्या घरी काम करतो. त्यांनी आणि संपूर्ण दानवे कुटुंबाने मला कायम घरातल्या व्यक्तीप्रमाणे वागणूक दिली. आज देखील माजी मंत्री दानवे यांनी माझ्या घरी सकाळीच उपस्थित राहिले. नवरदेव, माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण परिवारासाठी हा क्षण खूप आनंदाचा आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालना