रमजान ईद परंपरागत उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:29 IST2019-06-06T00:29:50+5:302019-06-06T00:29:56+5:30
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान पंरपरागत उत्साहात साजरी करण्यात आली

रमजान ईद परंपरागत उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरासह जिल्ह्यात रमजान पंरपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विविध ईदगाह आणि मशिदीत बुधवारी सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
जुना जालना भागातील मोतीबाग इद्गाह येथे मौलाना गुफरान यांनी नमाज पठण केली. यावेळी इक्बाल पाशा यांनी मार्गदर्शन केले. भारतासह न्यूंझीलंड, श्रीलंकेत झालेल्या दशहतवादी हल्लयाचा निषेध करून त्यांनी देशात शांतात व भाईचारा कायम राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी इदच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपाधीक्षक सुधीर खिरवडकर, पोलिस निरीक्षक राजेद्रसिंह गौर, यशवंत जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी शब्बीर अन्सारी,शहा आलमखान, शेख महेमूद, अब्दुल हाफिज,फेरोज अली मौलाना, अय्युब खान, बदर चाऊस, मोहमंद इप्तेखारोद्दीन, तैय्यब देशमुख, आमेर पशा, माजिद शेख, अब्दुल रशीद, अकबर खान, डॉ. रियाज, राजेंद्र राख, गणेश सुपारकर, मोहन इंगळे, बाबूराव सतकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.